खडकदेवळा येथील माहेरवाशीणीचा सासरच्या मंडळींकडुन छळ

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील खडकदेवळा येथील एका २१ वर्षीय विवाहितेचा सासरच्या मंडळींकडुन शारिरीक व मानसिक छळ होत असल्याने सततच्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खडकदेवळा येथील रहिवाशी दिव्या हिचा विवाह प्रशांत भाऊसाहेब बढे (रा. भिलवाडे ता. पाथर्डी जि. अहमदनगर) याचेशी झाला होता. लग्नानंतर चांगली वागणुक मिळाल्यानंतर सासरच्या मंडळींकडुन दिव्या हिचा किरकोळ कारणावरून शारिरीक व मानसिक छळ सुरू झाला.  सततच्या त्रासाला कंटाळून अखेर दिव्या हिने पती प्रशांत भाऊसाहेब बढे, भगवान भाऊसाहेब बढे (सासरे),  हिराबाई भाऊसाहेब बढे (सासु) व ज्योती आकाश घुले (नणंद) सर्व रा. भिलवाडे ता. पाथर्डी जि. अहमदनगर या चार जणांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे हे करित आहे.

Protected Content