भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील खंडाळा शिवारात दोन ठिकाणी बेकायदेशीर गावठी दारू बनविणाऱ्या दोन हातभट्टी भुसावळ पोलीसांनी उद्ध्वस्त करून १ लाख ३३ हजार रूपयांचा कच्चे व पक्के रसायन नष्ट केले असून दोघांविरोधात भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील खंडाळा शिवरातील नाल्याजवळ संशयित आरोपी इस्माईल छट्टू गवळी रा. शिवपूर हा बेकायदेशीर हातभट्टीची दारू तयार करतांना आढळून आला. त्यांच्यावर कारवाई करत त्याच्या जवळ ५० लिटर तयार दारू व कच्चे व पक्के रसायन असा एकुण ४७ हजार रूपयांचा माल हस्तगत करून नष्ट करण्यात आला. तर त्यांच्या शिवारात संशयित आरोपी रशीद रन्नू गवळी यांच्याकडेही ५५ लिटर तयार दारू आणि कच्चा माल असा एकुण ८६ हजार ४५० रूपयांचा माल नष्ट करण्यात आला. भुसावळ तालुका पोलीसांनी एकुण १ लाख ३३ हजार रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी कारवाई केली
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सपोनि अमोल पवार, पोहेकॉ विठ्ठल फुसे, अजय माळी, प्रवीण पाटील, रियाज काझी, प्रदीप इंगळे, संकेत झामरे, पोलीस पाटील रेवसिंग पाटील, होमगार्ड रितश सेकोकारे, गोपाल पवार, भुषण पवार यांनी केली आहे.