खंडणीखोरांना अटक करा ..

 

 

भुसावळ : प्रतिनिधी । डॉ.स्वप्नील कोळंबे यांना धमकी देणाऱ्या खंडणीखोरांना अटक करा अशी मागणी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी   पदाधिकाऱ्यांनी केली आहे

“ ये हमारा एरिया है,आपको यहा हॉस्पिटल चलना है तो हमे हप्ता देना पडेगा,नही तो अस्पताल बंद कर देंगे,अशी धमकी भुसावळ मधील डॉ.स्वप्नील कोळंबे यांना दि.१२ ऑक्टोबरला देण्यात आली आणि नंतर सतत धमकावण्यात आले यासंबंधी दि.२१ ऑक्टोबरला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात खाकीचा धाक आता ओसरत चालला आहे.अस चित्र तयार होत आहे, प्रत्येक आठवड्यात
खून , विनयभंग, दरोडा, चोरी, बलात्कार, मारामारी आदी घटना नित्य असून आता तर डॉक्टर मंडळींना दिवसाढवळ्या धमकी देणे.खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देणे इतपर्यंत मजल गेली आहे, सावदा येथील डॉ. सुनील चौधरी यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली, भाजप वैद्यकीय आघाडी याचा तीव्र निषेध करीत आहे

या खंडणीचा गुन्हाबाबत जलद तपास यंत्रणा राबवून गुन्ह्रेगारांना अटक करण्यात यावी. खटला जलद गती न्यायालयात चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी.  डॉ.कोळंबे ,डॉ. चौधरी आणि परिवाराला शासकीय खर्चाने संरक्षण देण्यात यावे. भुसावळ शहरात मिलिटरी,पँरामिलीटरी,राखीव पोलिस यंत्रणा यांची मदत घेत हत्यारे, गावठी    कट्टा, तलवारी आदी शोध मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी.   सर्व डॉक्टर मंडळींना स्वरक्षणार्थ हत्यारे वापरण्याची कायदेशीर परवानगी द्यावी. अशा मागण्या पोलीस आणि प्रशासनाकडे भाजपा वैद्यकीय आघाडीने केल्या आहेत

८  दिवसात खंडणीखोरांना पकडावे  अन्यथा संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये  भारतीय जनता पार्टी तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनाच्या प्रति .मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, .गृहमंत्री, पालकमंत्री, गृह सचिव, .जिल्ह्याधिकारी आणि जिल्हयातील आमदार व खासदारांना पाठविण्यात आल्या आहेत असे डॉ . नि. तू . पाटील यांनी सांगितले .

Protected Content