Home उद्योग क.ब.चौधरी विद्यापीठातील विज्ञान प्रशाळातर्फे ‘ई-उद्योजकता’ परिषदेचे आयोजन

क.ब.चौधरी विद्यापीठातील विज्ञान प्रशाळातर्फे ‘ई-उद्योजकता’ परिषदेचे आयोजन


जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील इनोव्हेशन इनक्यूबेशन केंद्र आणि संदीप विद्यापीठातील विज्ञान प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यामानाने उद्यापासून राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय ई- उद्योजकता परिषद होणार आहे.

या ई-परिषदेत पद्मश्री प्रा.अशोक झुणझुणवाला(आयआयटी,चेन्नई), अमिताभ मिश्रा (नवी दिल्ली), उमेशचंद्र दंडगव्हाळ (नाशिक), डॉ. मिलिंद चौधरी (पुणे), डॉ. संदीप पाटील(कानपुर) हे तज्ज्ञ नवोपक्रम,तंत्रज्ञान आणि उद्योजकता यावर मार्गदर्शन करणार आहेत.सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी 9168644463 या क्रमांकावर नोंदणी करावी, असे आवाहन इन्क्युबेशन केंद्राचे संचालक प्रा.भुषण चौधरी व संदीप विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा.वासुदेव झांबरे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound