
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे येथील बाळकृष्ण शेठ भाटीया माधामिक विद्यालयातील क्रिडा शिक्षक किशोर पाटील यांना भारतरत्न मौलाना आझाद राज्यस्तरीय पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. क्रिडा क्षेत्रात व साहित्यात उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
जळगाव येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊडेशन यांच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार २०१९साठी किशोर एस पाटील यांच्या क्रिडा क्षेत्रातील व बालकासाठी, उपेक्षित समाजघटकातील अडचणी व समस्यांवरील साहित्य लेखनासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष फिरोजशेख यांनी निवड समीतीमार्फत श्री. पाटील यांना निवड पत्र पाठवले असून सदर पुरस्कारचे वितरण मान्यवरांच्या हस्ते दि. २३ फेब्रूवारी रोजी अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे होणार आहे. किशोर पाटील यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीप रामु पाटील यांच्यसह सर्व संचालक, मुख्यध्यापिका अनिता पाटील, सर्व शिक्षक वृंद व गावातील मान्यवर, नागरिक, आजी-माजी विद्यार्थ्यांनी यांनी अभिनंदन केले आहे.