पुणे (प्रतिनिधी) कौटुंबिक वादातून पतीने गळफास घेतल्यानंतर पत्नीनेही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज पुण्यात घडली आहे.
सूरज पालसिंग सोनी (वय २७, न्यू नानापेठ) व करिना पालसिंग सोनी (वय २०) अशी आत्महत्या केलेल्या दांपत्याची नावे आहेत. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात येत आहे. पती-पत्नीने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच पुण्यातील सुखसागर नगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.