कोव्हॅक्सिन लस नव्या व्हेरिएंटवर प्रभावी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद व  भारत बायोटेकने बनविलेली कोव्हॅक्सिन लस अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटवर प्रभावी आहे, अशी माहिती अमेरीकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने दिली आहे.

 

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. आता ही लाट ओसरत आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. या नवीन  डेल्टामुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  भारतात विकसीत झालेल्या लसीला अमेरिकेने करोनाविरूद्ध प्रभावी असल्याचे म्हटले आहे.

 

कोव्हॅक्सिन लस शरीरात प्रतिकारशक्ती तयार करते. या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरीकांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. तर यामध्ये शरीरात अँटीबॉडी आढळल्या आणि  कोव्हॅक्सिन लस अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ म्हटले आहे.

 

कोव्हॅक्सिन लस शरीरात वेगात अँटीबॉडी तयार करते. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील परिनाम ही लस सुरक्षित आणि चांगली असल्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने म्हटले आहे. नवीन व्हेरिएंटवर ही लस ७० टक्के प्रभावी आहे. करोनाच्या B.1.17 (अल्फा) आणि B.1.617 (डेल्टा) व्हेरिएंटवर ही लस प्रभावीपणे काम करते, असे अमेरिकेन अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

 

 

 

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद व  भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन लस बनवली आहे. अल्फा B.1.1.7 व्हेरिएंट सर्वातआधी ब्रिटनमध्ये आढळला होता. तर डेल्टा B1.617 व्हेरिअंट सर्वातआधी भारतात आढळून आला.

 

Protected Content