‘कोविड-१९ माहिती पुस्तिका’ जनजागृतीसाठी महत्वपूर्ण : गुलाबराव वाघ (व्हिडीओ)

धरणगाव प्रतिनिधी । कोरोनाविरुद्धचा आपला संघर्ष सुरू असतांना कोरोनाविषयी असलेला गैरसमज व अपूर्ण माहितीमुळे नागरिकांमध्ये अधिकची भीती निर्माण झाली आहे. अशा कठीण काळात लाइव्ह ट्रेंड्स न्यूजची ‘कोविड-१९ माहिती पुस्तिका’ जनजागृतीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असून नागरिकांच्या मनातील भीती काढून कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी बळ देणारी असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. ते येथील पालिकेत माहिती पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मलाइव्ह ट्रेंड्स न्यूजफची ‘कोविड-१९ माहिती पुस्तिका’ आज धरणगाव पालिकेत मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ पुढे म्हणाले की, पुस्तिकेतील माहिती अत्यंत उपयुक्त आहे. नागरिकांना कोरोना आजाराविरूढ कसं लढायचं? याची संपूर्ण माहिती मिळते. तसेच ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या औषधी विषयी देशातील ख्यातनाम होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. जसवंतसिंग पाटील यांची मुलाखत खूपच माहितीपूर्ण असून सर्वांनी अगदी आवर्जून वाचावी, अशी असल्याचेही श्री. वाघ म्हणाले.

यावेळी शहरप्रमुख राजेंद्र वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्षा कल्पनाताई महाजन, गटनेते विनय भावे, चर्मकार संघटनेचे राज्यप्रमुख भानुदास विसावे, विलास महाजन, विजय महाजन, संजय चौधरी, उद्योजक मोहन महाजन, किरण मराठे, नगरसेवक अजय चव्हाण, योगेश वाघ, सुरेश पारेराव, कल्पेश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

खालील व्हिडीओत पहा गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केलेले विचार.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/640124223265811

Protected Content