चोपडा प्रतिनिधी । कोविड-१९ विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली..
याबाबत वृत्त असे की, कोविड १९ संदर्भात चोपडा येथे आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत आमदार लताताई सोनवणे यांनी बाहेर गावाहुन येणारे नागरिकांवर बारकाईने लक्ष देणे गरजेचे असुन नागरिकांनी कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना बाहेर निघणार नाहीत याची देखील दक्षता घेणे व्यापारी बांधवांना प्रशासना कडून देण्यात येणार्या सुचनाचे पालन करण्यात यावे असे आवाहन केले. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे,पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, उपविभागीय पोलीस अधिकारी सौरभ अग्रवाल, तहसीलदार अनिल गावित,मुख्याधिकारी अविनाश गांर्गुडे, उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदिप लासुरकर सहाय्यक पोलिस निरीक्षक चोपडा शहर मनोज पवार, चोपडा ग्रामीण पोलिस निरीक्षक संदीपराव आराख,अडावद पोलिस निरीक्षक योगेश तांदळे यांच्या सह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.