कोळगाव येथे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त घेतली शपथ

WhatsApp Image 2020 01 25 at 10.49.12 AM

भडगाव,प्रतिनिधी | तालुक्यातील कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव येथे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.

विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक-प्राध्यापिका तसेच शिक्षक-शिक्षकेतर यांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात  राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त घेतली शपथ घेण्यापूर्वी प्रा.मनेष पाटील यांनी उपस्थितांना मतदार दिनाचा उद्देश प्रास्ताविकातुन सादर केला. त्यानंतर विद्यार्थी-विद्यार्थिनी,प्राध्यापक-प्राध्यापिका व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. प्राचार्य आर.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रभारी पर्यवेक्षक आर. ए. पाटील, प्रा. माया मराठे, प्रा. एम. ए. पवार,  प्रा. एस. आर. सोनवणे आदि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content