कोल्हे हिल्सवर कारचा अपघात; तरूण जागीच ठार, तीन जखमी

apghat

जळगाव प्रतिनिधी । मित्रांसह कारने कोल्हे हिल्सवरून घरी परतत असतांना समोरून येणाऱ्या कारला वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटल्याने कार उलटी होवून एक जण जागीच ठार तर तिघेजण जखमी झाल्याची घटना आज सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली असून तिघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

bhupendrapatil

याबाबत माहिती अशी की, वाघ नगर परीसरातील जिजाऊ नगरात राहणाऱ्या भुपेंद्र संतोष पाटील (वय-32) हे आयसीआयसीआय कंपनीत नोकरीला आहे. आज रविवार असल्याने मित्र समेश पराग गुळवे रा. भुषण कॉलनी, अलाफ राजेंद्र कुलकर्णी रा. मुंदडा नगर आणि विजय पाटील (पुर्ण नाव माहित नाही) याच्यासोबत त्याच परीसरात असलेले कोल्हे हिल्स टेकडीवर कार क्रमांक (एमएच १९ बीजे ८९८) ने गेले. त्याठिकाणी तास दीड तास थांबून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी जाण्यासाठी कार निघाले. यावेळी कार ही अलाफ कुलकर्णीची असून भुपेंद्र पाटील चालवित होता. कारने टेकडीच्या खाली उतरत असतांना समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात भुपेंद्र पाटील याचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट रोडच्या खाली उतरल्याने तीन वेळा पटली झाली. या अपघातात भुपेंद्रचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित तिघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

मयत भुपेंद्र पाटील हा आयसीआयसीआय बँकेत नोकरीला होते. मुळ राहणार रोटवद ता. धरणगाव येथील रहिवाशी असून त्यांचे वडील संतोष पाटील हे रूस्तमजी इंग्लीश मिडीयम शाळेत सेक्यूरीटी म्हणून नोकरीला तर मोठा भाऊ दिपक पाटील हा पुण्यात खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्याच्या पश्चात आई उषाबाई, वडील संतोष पाटील, पत्नी सपना, मोठा भाऊ दिपक पाटील आणि धनश्री आणि भाग्यश्री या दोन जुळवा मुली असा परीवार आहे.

जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
अपघात घडल्यानंतर परीसरातील तरूणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मयत भुपेंद्रसह इतर तिघे जखमींना खासगी वाहनाने तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्यात आले. अपघात घडल्यानंतर मित्र मंडळी आणि नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात धाव घेतली. दरम्यान भुपेंद्रची पत्नी सपना, आई उषा आणि वडील संतोष पाटील यांनी जिल्हा वैद्यकिय महावद्यालयात एकच आक्रोश केला होता.

Protected Content