कोल्हापूर/ मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – कोल्हापूर उत्तर, मतदारसंघातून झालेल्या पोटनिवडणूकीत कॉंग्रेसच्या जयश्री जाधव विजयी झाल्यात. अपक्ष उमेदवारांसह अन्य १३ उमेदवारानी निवडणूक लढवली, यात करुणा मुंढेंना केवळ १३३ मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून झालेल्या पोटनिवडणूकीसाठी भाजपा, महाविकास आघाडीसह अन्य असे १३ उमेदवारानी निवडणूक लढविली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या जयश्री जाधव या ९६ हजार २२६ मते मिळवीत विजयी झाल्या, तर भाजपचे सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२६ मतेमिळाली असून दुसऱ्या क्रमांकावर होते.
या पोटनिवडणुकीत मतमोजणीच्या २६ फेऱ्या होत्या. तर या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार करुणा मुंढें यांना केवळ १३३ मते मिळाली आहेत. त्यामुळे करुणा मुंढें यांनी या निकालावर आक्षेप घेत निवडणुकीत आचारसंहिता उल्लंघन झाले असून यासंदर्भात हि निवडणूक रद्द करण्यात यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे मुंढे यांनी म्हटले आहे. या पोटनिवडणुकीत सुमारे १लाख ६५ हजाराहून अधिक मतदारांनी matdan केले. यात एकूण मतदानापैकी १७८८ म्हणजेच सुमारे ११ टक्के नागरिकांनी ‘नोटा’ चा पर्याय निवडला, हे विशेष.