Home Cities जळगाव कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्यांना दोन आठवडे ई-पास देणे बंद

कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्यांना दोन आठवडे ई-पास देणे बंद


जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी 20 जुलै 2020 पासून पुढील दोन आठवडे संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन घोषित केलेला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांना पुढील दोन आठवडे कालावधीसाठी ई पास देणे बंद करण्यात आले आहे.

 

जिल्ह्यातील नागरीकांनी कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे प्रवास पास मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू नये. केल्यास अशा अर्जांचा विचार करता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे यांनी कळविले आहे.


Protected Content

Play sound