नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा व इतर धोरणां संबंधीच्या मुद्यांवर सुनावणी सुरू झाली आहे.
या सुनावणी दरम्यान न्या डी वाय चंद्रचूड यांनी ऑक्सिजन पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत एक अशी व्यवस्था बनवली जावी, ज्याद्वारे लोकांना कळाले पाहिजे की ऑक्सिजनचा किती प्रमाणात पुरवठा केला गेला आहे आणि कोणत्या रूग्णालयात किती ऑक्सिजन उपलब्ध आहे.
न्या चंद्रचूड म्हणाले की, आम्ही हे देखील ऐकत आहोत की, नागरीक ऑक्सिजन सिलिंडरसाठी रडत आहेत. दिल्लीत खरोखर ऑक्सिजन उपलब्ध नाही, गुजरात, महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. सरकारला आम्हाला हे सांगाव लागेल की आज आणि सुनावणीनंतरच्या दिवसापासून परिस्थीतीत काय फरक पडेल.
याशिवाय न्या चंद्रचूड म्हणाले की, आमच्या समक्ष काही अशा देखील याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत, ज्या गंभीर स्वरूपात स्थानिक मुद्दे समोर आणत आहेत. असे मुद्दे उच्च न्यायालयात उचलले गेले पाहिजेत