कोरोना : विविध देशांच्या भूमिकांवर तज्ज्ञाच्या गटाचे ताशेरे

 

वाशिंग्टन : वृत्तसंस्था । सुरुवातीलाच कोरोनाला रोखता आलं असतं. पण लागोपाठ चुकीच्या निर्णयांमुळे आणि सुरुवातीच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रादुर्भाव वाढला  आजपर्यंत जगभरात ३३ लाख लोकांचा जीव गेला आहे”, अशा शब्दांमध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या गटाने जगभरातल्या सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. 

 

खुद्द जागतिक आरोग्य संघटनेच्या धोरणावर देखील या गटाने परखड टीका केली आहे. दि इंडिपेंडंट पॅनल फॉर पँडेमिक प्रिपेर्डनेस अँड रिस्पॉन्स गटाने ही निरीक्षणं नोंदवली आहेत.

 

“जागतिक आरोग्य संघटनेसोबतच इतरही अनेक देशांनी चीनमधल्या वुहानमध्ये झालेल्या सुरुवातीच्या उद्रेकाकडे दुर्लक्ष केलं. तातडीने पावलं उचलण्यात हे देश कमी पडले फेब्रुवारी २०२०मध्ये कोरोना जगभरात पसरला. इशाऱ्याकडे लक्ष देण्यात अनेक देश कमी पडले”, अशा शब्दांत या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत. “निरनिराळ्या देशांमधील सरकारांना लोकांचं संरक्षण करण्यात अपयश आलं असून विज्ञानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांनी जनतेचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यास हातभारच लावला”, असं देखील अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

 

कोरोनासारख्या संकटासाठी तयारी करण्यात दाखवलेली दिरंगाई, अपयश आणि निर्णयांमध्ये असलेल्या त्रुटी यामुळे या संकटाचं गांभीर्य वाढलं”, “चुकीचे निर्णय आणि नियोजनाचा अभाव यामुळे एक विषारी कॉकटेल तयार झालं आणि त्यातून प्रादुर्भाव वाढला”, असं यात म्हटलं आहे.

 

सध्याच्या साधीचा सामना करायचा असेल, तर जगातल्या श्रीमंत देशांनी १०० कोटी लसीचे डोस सर्वाधिक गरीब देशांना पुरवले पाहिजेत. या देशांनी अशा प्रकारच्या पुढच्या साथींचा सामना करण्यासाठी तयारी करणाऱ्या संस्थांना आर्थिक पाठबळ द्यायला हवं, असं देखील या अहवालात नमूद करण्यात आलं आहे

Protected Content