चोपडा, प्रतिनिधी | सध्या जगभर कोरोना साथीच्या प्रदुर्भाव वाढत असून भारतातही विशेषतः महाराष्ट्र कोरोना पेशंटच्या संख्येत वाढ ही चिंताजनक बाब बनली आहे. या आशा कर्मचारी, अंगणवाडी, ग्रामपंचायत कर्मचारी घरोघर दप्तर घेऊन तसेच थर्मामीटर घेऊन फिरताहेत त्यांच्या सुरक्षिततेकडे जिल्हाप्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी आयटकतर्फे करण्यात आली आहे.
आशा कर्मचारी, अंगणवाडी, ग्रामपंचायत कर्मचारी घरोघर दप्तर घेऊन तसेच थर्मामीटर घेऊन फिरताहेत. त्यांच्या सुरक्षेकडे जिल्हा आरोग्य प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. त्यांची प्रतिकारशक्ती टिकून राहावी म्हणून त्यांना कामाची वेळेत नाश्ताची व्यवस्था व्हावी. त्यांना मास्क..सॅनिटायझर..हातमोजे ..जंतुनाशक साबण ..गावात फिरतान पीपीई किट हे साहित्य द्यावेच तसेच त्यांच्या सोबत आरोग्य खात्याचे अनुभवी एमपीडब्ल्यू एएनएम हे देखील असावेत. गावातील ग्रामपंचायतीचे कामगार यांना सुरक्षाविषयक साधन देणे आवश्यक आहे. त्यांची प्रतिकारशक्ती टिकून राहण्यासाठी सकस आहार घेता याबा म्हणून त्यांचा पगार, थकीत पगार दरमहा देण्याची व्यवस्था व्हावी. १४ व्या वित्त आयोगातून या कर्मचाऱ्यांना एप्रिल ते जून काळात तीन महिन्यासाठी दरमहा हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जाहीर केले. तो अजून मिळालेला नाही. नगरपालिका क्षेत्रातील आशा, अंगणवाडी, सफाई कामगार यांनाही चोपडा नगरपरिषद मुख्य अधिकारी प्रमाणे प्रोत्साहन भत्ता व सन्मानपत्र देण्याचा आदर्श इतरही नगर परिषद यांनी घ्यावा. तुटपुंज्या मानधन, मोबदला, पगारावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या वाढ फरकासह अदां करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमृत महाजन यांनी केली आहे.