कोरोना रुग्णांनी क्षयरोगाची तपासणी करुन घेण्याचा सल्ला

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना साथीच्या काळात क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याच्या वृत्त समोर येत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  कोरोनातून बरे झालेल्या सर्वांना क्षयरोगाची चाचणी करण्याचा सल्ला दिला आहे.

 

कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये क्षयरोगाच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याच्या वृत्तानंतर मंत्रालयाकडून हा सल्ला जारी केला आहे. ज्यामध्ये कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व   पॉझिटिव्ह रूग्णांची क्षयरोगाची तपासणी करुन उपचार केले पाहिजेत असा सल्ला दिला गेला आहे.

 

सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, ऑगस्ट २०२० च्या सुरूवातीस देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना   संक्रमित आणि क्षयरोग रूग्णांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासह, टीबी- कोरोना आणि टीबी-आयआयएलआय / एसआरआयच्या तपासणीसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सल्ला देऊन वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली गेली आहेत.

 

 

जेव्हा २०२० च्या सुरूवातीस टीबी रुग्णांच्या बाबतीत जवळपास २५ टक्के घट झाली आहे तेव्हा हा सल्ला आरोग्य मंत्रालयाने जारी केला आहे.  केंद्र सरकारने सांगितले की रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये क्षयरोगाच्या रूग्णांची तपासणी करण्याबरोबरच देशातील सर्व राज्यातील पीडित व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहेत.

 

हे दोन्ही रोग संक्रमक मानले जातात आणि या रोगांचा प्रामुख्याने रूग्णांच्या फुफ्फुसांवर परिणाम होतो, ज्यामध्ये खोकला, ताप आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी लक्षणे असतात.टीबीमध्ये तापाचा कालावधी जास्त असतो आणि रोगाची सुरुवात हळू होते.

 

Protected Content