कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी खोटी ; ‘बिग बीं’चे ट्वीट !

मुंबई (वृत्तसंस्था) प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे वृत्त काही चॅनेलने प्रसारित केले होते. परंतू एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ पोस्ट करत ‘बिग बीं’नी ‘ती न्यूज फेक आहे, बनावट आहे’, असे ट्विटरवर स्पष्ट केले आहे.

 

 

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला असून त्यांना एक-दोन दिवसात डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय काही प्रसारमाध्यमांनी याबाबत बातमीदेखील प्रकाशित केली आहे. यावर अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करुन ही बातमी खोटी, बेजबाबदार आणि अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन व आठ वर्षीय आराध्यालाही करोनाची लागण झाली आहे. या चौघांवर उपचार सुरू आहेत.

Protected Content