यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूमुळे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत आहे. त्यामुळे बाहेरगावी गेलेल्या नागरीकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. आजपर्यंत बाहेरगावाहून आलेल्या तालुक्यातील एकुण ६ हजार २२६ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
तालुक्यातील भालोद येथील भालोद प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात राज्यातून ९६९ परराज्यातून ८३ प्रदेशातून दोन हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्र या कार्यक्षेत्रात राज्यातून १००९ परराज्यातून ५३ प्राथमिक किनगाव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्र राज्यातून आलेल्या नागरिकांची संख्या ७०३ परराज्यातून आलेल्या नागरिकांची संख्या ६५ पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्रात ६७३ परराज्यातून आलेले नागरिक २३ त्याचप्रमाणे साखळी प्राथमिक आरोग्य केंद्र च्या कार्यक्षेत्रात राज्यातून आलेल्यांची संख्या १०४० परराज्यातून आलेल्यांची संख्या ९१ त्याचप्रमाणे सावखेडा सिम ७१० परराज्यातून आलेल्या संख्या ४६ याप्रमाणे ग्रामीण भागात बाहेरगावाहून आलेल्यांची संख्या ५ हजार १०५ तर परराज्यातून आलेल्यांची संख्या ३६१ व विदेशातून आलेल्यांची संख्या दोन असून नगरपालिकाच्या कार्यक्षेत्रात ४०३ व परराज्यातून बैलांची संख्या ९२ विदेशातून आलेल्यांची संख्या ४ यावर नगरपरिषदेच्या क्षेत्रात आलेल्या नागरिकांची संख्या २९८ परराज्यातून २१ अशी असून २७ एप्रिलपर्यंत यावल तालुक्यात बाहेरगावी आलेल्यांची एकूण संख्या ५ हजार ८०६ परराज्यातून आलेले ४०४ व विदेशातून आलेल्यांची संख्या १६ असे एकूण ६ हजार २२६ नागरिकांनी यावल तालुक्यात आपल्या गावी परतले असून या सर्व नागरिकांना आरोग्य विभागाच्या तपासणीनंतर ओम क्वारंटाईन करण्यात आले आहे. यातील सर्दी, ताप, खोकला, घसादुखीचे लक्षण असलेले २७ नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्यसेविका अथवा आशावर्कर निदान करीत आहे.
वैद्यकिय अधिकारी यांचे आवाहन
यावल तालुक्यात बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती अचूक व काळजीपूर्वक द्यावी, असे आवाहन यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ.फिरोज तडवी, किनगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन, सावखेडा सिमचे डॉ.गौरव भोईटे, डॉ.नजमा तडवी आदींनी केले आहे.