भुसावळ प्रतिनिधी । तीन महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने कामावर न जाण्याचा इशारा ४८ आशासेविका यांनी दिला असून त्वरीत मागण्या मान्य करण्याचे प्रांताधिकारी यांना निवेदन दिले.
कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आशा वर्करांना पाठविण्यात येत असून या रुग्णांच्या घरातील सर्व रहिवाशांची सर्वेक्षण करण्यासाठी आशासेविकांची मदत घेतली जात आहे. मात्र आशासेविकांना नगरपरिषदेकडून मास्क, सॅनिटायझर असे कुठलाही पुरवठा केला जात नाही पॉझेटिव्ह रुग्णांच्या परिसरात पाठविण्यात येत आहे. तीन महिन्यापासून मानधनही मिळत नसल्याने ४८ आशासेविकांना मानधन न दिल्यास एकही आशासेविका कामावर जाणार नसल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. किमान १० हजार रुपये पगार करण्यात यावी, खडका गावातील एक आशासेविका मयत झाली असून आतापर्यंत तिच्या कुटुंबियांना शासनाने विम्याची रक्कम दिलेली नसल्याने आमचे काय होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आशा वर्करांच्या मागण्या त्वरित मान्य करण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.