भुसावळ, प्रतिनिधी । आज आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून डॉ. नितु यांनी मानवी जीवनात योगचे महत्व सरळ सोप्या भाषेत उलगडून दाखवत कोरोना महामारीपासून बचाव होण्यासाठी योग उपयुक्त असल्याचे स्पष्ट केले आहे. वाचा योग महात्म्य त्यांच्याच शब्दात
भारत सरकार प्रणित,२१ जून ,जागतिक योग दिनाच्या सर्वांना जागतिक शुभेच्छा…!
संस्कृत मधील,” युज् “या धातूंपासून योग हा शब्द सिद्ध झाला आहे. अलीकडे पुष्कळ माणसे”योग” या शब्दएवजी “योगा”असे चुकीचे म्हणतात. भारत हा योगचे उगमस्थान आहे, आणि आपण भारतीय म्हणून जन्मलो हो पण एक योग साधनाच आहे.भारतात पुष्कळ योग असल्याने सर्वसामान्य व्यक्ती गोंधळून जातो.
हठयोग, ह्या योगात आसने, बंध, मुद्रा इत्यादी केवळ शारीरिक क्रिया होतात,प्राणाच्या नियमित योगाने कुंडलिनी जागृत होते…!
मंत्रयोग, वाणीच्या साहाय्याने जपरूपी क्रिया…!
लययोग, मानसिक शुद्धिची परिसीमा…!
राजयोग, मनाची मर्यादा ओलांडून आध्यत्मिक क्षेत्रात उच्चतम शिखर गाठणे,पतंजलीच्या अष्टांग योगाबरोबर अद्वैताची जुळणी..!
कर्मयोग, प्रत्येक कर्म प्रमाणिक पणे करणे, फळाची अपेक्षा न ठेवणे, कर्म परमेश्वराला अर्पण करणे.…!
भक्तियोग,ईश्वराबद्दल निरतिशय प्रेम आणि त्या प्रेमातून परमेश्वराची भक्ती…!
ध्यानयोग,ध्यानाच्या माध्यमातून परमेश्वराशी एकी साधणे…!
ज्ञानयोग, शास्त्र अध्ययन आणि गुरूच्या मार्गदर्शनाने दीर्घकाळ महावाक्यांचे मनन केल्यावर स्वतः च्या अंतःकरणात ईश्वराची उपलब्धी…!
महायोग, गुरूने दीक्षा दिल्यावर साधकाला गुरुकृपा होउन, विविध शारीरिक आणि मानसिक अनुभव येतात, या योगात चित्ताच्या निरनिराळ्या वृत्तीचा निरोध मुद्दाम करावा लागत नाही,तर ते निरोध आपोआपच होत असतात, याचे वैशिष्ट्य..!
गुरू आपली दैवी शक्ती स्पर्शाने, मंत्राने, दृष्टीने किंवा संकल्पाने श्रद्धाळू शिष्याचा ठिकाणी संक्रमित करतात…!कुंडलिनी जागृती विनासायास होते…!
यालाच सिद्धयोग, सहजयोग, शक्तीपातयोग, क्रियायोग म्हणतात…!
सर्व योग मध्ये हा सर्वश्रेष्ठ योग…!
वरील विविध योग यांपैकी आपण नक्कीच दैनंदिन जीवनात एकतरी आचरणात आणत असूच.…!
शरीराला अनंताशी जोडणारा दुवा म्हणजे योग…!
चंचल मनाला अचल करणारी साधना म्हणजे योग…!
आंतरिक शक्तीचे स्फुरण म्हणजे योग…!
स्व:ची जाणीव करून देणारा म्हणजे योग…!
कुंडलिनी जागृत करण्याचे माध्यम म्हणजे योग…!
सप्त चक्रांना भेदणारी साधना म्हणजे योग…!
दिव्यत्वाचा प्रखर प्रकाश म्हणजे योग…!
समर्पणाची भावना म्हणजे योग…!
प्राणवायूचे संतुलन म्हणजे योग…!
व्याधीवर इलाज म्हणजे योग…!
नित्य आनंदाची अनुभूती म्हणजे योग…!
निष्काम कर्मयोगाची सुरुवात म्हणजे योग…!
हा देह म्हणजे मी नाही याची जाणीव म्हणजे योग…!
तुझे आहे तुजपाशी म्हणजे योग…!
आत्म्याचे परमात्मा होण्याचे तंत्र म्हणजे योग…!,,
असे योगचे महात्म असून ह्या वैश्विक कोरोना महामारीपासून बचाव होण्यासाठी, सुदृढ उपचार होण्यासाठी सर्वांनी कुठल्याही योगपासून सुरवात करावी,
जीवन किती अनिश्चित,
क्षण भुंगर आहे
हे आपण सर्वजण मागील मार्च महिन्यापासून अनुभवत आहोत, तेव्हा आपल्या सर्वांवर जी प्रापंचिक जबाबदारी आहे,ती पार पाडत पाडत योगद्वारे अध्यात्मिक प्रगती करत परमात्म्याशी संगत जोडू या…!
सर्वांना हळूहळू शेवटची योग साधना म्हणजे महायोग/सिद्धयोग/ सहजयोग/शक्तीपातयोग/ क्रियायोग ही साधना प्राप्त होउ द्यावी, हीच प्रभू चरणी प्रार्थना…!
“लाखातील एक करे हा प्रयास।
ऐसे घेता लाख प्राप्त करी एक।
दारुण प्रयत्न आणि दैवयोगे।
सद्गुरू कृपे आत्मज्ञान लाभे ।।
लाखातील एखाद्याच जीवाला ‘अध्यात्म विद्या’ शिकण्याची इच्छा होते, असे लाखभर म्हणजे कोट्यवधीत एखाद्यालाच हे प्राप्त होते, पण तेही सहज नाही,दारुण प्रयत्न,आपला दैवयोग आणि सिद्धगुरु कृपा यांचा त्रिवेणी संगम झाला तरच हे शक्य आहे,हे होते ते नक्की, त्रिवार सत्य…!
तेव्हा क्षणिक भौतिक सुखाच्या मागे न लागता योग साधनेद्वारे परमात्माशी एकरूप होण्याची प्रेरणा सर्वांनाच होवो,हीच या योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा…!
तेव्हा काळजी घ्या…!
घरात राहा…!
डॉ. नितु पाटील,भुसावळकर