भुसावळ प्रतिनिधी । शहरातील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने जनता कर्फूला 100 टक्के प्रतिसाद देऊन भुसावळ आगारातून जाणाऱ्या सर्व बसेस 22 मार्च रोजी सकाळपासून सेवा बंद ठेवण्यात आली आहे. कोरीना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने शासनाच्या आदेशाचे पालन करून बस सेवा बंद ठेवली आहे.
भारतात कोरीना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण भारतावासीयांनी आज 22 मार्चला “जनता कर्फ्यू”बंद पुकारले.शासनाने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आगरावर बस सेवेच्या होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.शेजारी रेल्वे स्टेशन असल्याने बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांनमुळे कोरीना वायरस पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शासनाने उचललेले पाऊल हे योग्य आहे. यासाठी जनतेनेही सहकार्य करणे गरजेचे आहे.