कोरोना : बुलढाण्यात ५६ नागरिक निरीक्षणाखाली

 

बुलढाणा, प्रतिनिधी । कोरोना व्हायरस या आजाराची लक्षण असलेले रुग्ण आढळून येत आहे. त्यांना घरामध्ये एका स्वतंत्र खोलीत ठेवण्यात येत आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले की, घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली ५६ नागरिक आहेत. काल दि. २२मार्चपर्यंत घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली ५५ नागरिक होते. दि. २२ रोजी नवीन निरीक्षणाखाली एका नागरिकाला ठेवण्यात आले आहे. घरात स्वतंत्र खोलीत निरीक्षणात १४ दिवस पूर्ण केलेले नागरिक जे आज निरिक्षणातून मुक्त करण्यात आलेले नाही. अशाप्रकारे घरामध्ये स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली ५६ नागरिक आहेत. संशयीत म्हणून बुलडाणा आयसोलेशन कक्षात १ नागरिक आहे. नागपूर प्रयोगशाळेत १ swab नमुने पाठविण्यात आले आहे. नागपूर येथून प्राप्त रिपोर्ट निरंक आला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे.

Protected Content