चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता चाळीसगाव तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांवर शहरातच उपचार व्हावेत यासाठी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारती मध्ये दोन हॉल तयार करण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी आज प्रशासनाला दिल्या.
आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे, डॉ.बी.पी.बाविस्कर यांच्यासह ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी सीए भूषण भोसले, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, कैलास पाटील आदी उपस्थित होते. चाळीसगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारती मध्ये दोन हॉल तयार करण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी आज प्रशासनाला दिल्या. यामुळे आता कोरोना बाधीतांवर चाळीसगावातच उपचार होणार आहे. उपचारासाठी तयार करण्यात येणार्या दोन्ही हॉल मध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा रुग्णांना देण्यात याव्यात असे निर्देशदेखील आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले.