Home Cities अमळनेर कोरोना बाधीत महिलांच्या संपर्कातील संशयितांचे अहवाल निगेटीव्ह

कोरोना बाधीत महिलांच्या संपर्कातील संशयितांचे अहवाल निगेटीव्ह

0
60

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील २९ कोरोना संशयित रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले असून यात मुंगसे व अमळनेर येथील पॉझिटीव्ह महिलांच्या संपर्कातील आठ जणांचा समावेश आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, येथील कोविड रूग्णालयात गेल्या तीन दिवसापूर्वी कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्ती पैकी 29 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

यामध्ये मुंगसे, अमळनेर येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील आठ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या 105 तपासणी अहवालापैकी आज 64 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 61 अहवाल निगेटिव्ह तर 03 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ भास्कर खैरे यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound