कोरोना नियमांचे उल्लंघन – डी मार्ट व आदित्य फार्मला करणे दाखवा नोटीस

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी कारवाई करत आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गर्दीच्या ठिकाणावर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करण्याऱ्या अनुक्रमे बुधवार व गुरुवारी महापालिका प्रशासनाने डी मार्ट व आदित्य फार्म यांना दंडात्मक कारवाई करून प्रतिष्ठान सील का करू नये अशी नोटीस बजावली आहे.

 

उपायुक्त शाम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महापलिकेच्या पथकाने २६ जानेवारी रोजी शिरसोली रोडवरील डी-मार्ट मॉलची पाहणी केली यावेळी शंभर पेक्षा जास्त ग्राहक एकाच वेळी आढळून आलेत. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन,चेहऱ्यावर मास्क,ग्राहक व दुकानातील स्टॉफ यांचे लसीकरणव इतर अटी शर्तीचे पालन न केल्याचे आढळून आले. आदित्य फार्म येथे २७ जानेवारी रोजी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लग्न समारंभात ५० नागरिकांना परवानगी असतांना या समारंभात २०० नागरिक सहभागी झाले असल्याचे मनपा पथकास आढळून आले. या नागरीकांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे मास्क तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन झालेले नव्हते. यामुळे आदित्य फार्म व डि-मार्ट सुपर शॉपी यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची दंडात्मक कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल का करण्यांत येवु नये ? प्रतिष्ठान सील का करण्यात येऊ नये अशी नोटीस आज ३१ जानेवारी रोजी बाजवण्यात आली आहे. या नोटीसीचा खुलासा संबंधितांनी २४ तासात करावयाचा आहे.

 

Protected Content