चाळीसगाव, प्रतिनिधी । कोरोना झाला तर सारे कुटुंबच घाबरून जाते. क्षणात पायाखालची माती निघाल्यासारखे होते. मात्र घाबरून न जाता संयमाने कोरोना झाला तरी विचार पॉझिटिव्ह ठेऊन कोरोना सहज निगेटिव्ह करू शकतो. यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने धीर देऊन कायम सकारात्मक विचारांची देवाण घेवाण केली तर शंभर टक्के तुमचा कोरोना बरा होणारच. त्याच बरोबर योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत असे प्रतिपादन डॉ सुनील राजपूत यांनी विचार व्यक्त केलेत.
ते रोटरी क्लब झूम मिटिंग द्वारे आयोजित कोरोना आणि आपले विचार या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. क्लबच्या अध्यक्ष नितीन पाटील उसुस्थित होते. यावेळी डॉ. राजपूत पुढे म्हणालेत की, कोरोनाला सहज ही कोणी समजू नये. शक्य तितकी काळजी घेण्याची गरज आहे. खूपच गरज असेल घराबाहेर जावे लागेल तर आपण मास्क बांधूनच जावे. बाहेर कुठल्याही वस्तूला गरज नसताना हात लावू नये.त्याच बरोबर घरातील वयस्कर व्यक्तीची काळजी नियमित घेतली पाहिजे. त्याच बरोबर ऑक्सिमीटर ,थर्मामीटर, ग्लुकोमीटर असे उपकरणे घरात ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. राजपूत यांनी कोरोनाची ११ लक्षणे सांगितली . तसेच कोविड-१९ हा विषाणू शरीरात गेल्यावर नक्की काय होत ? याची माहिती दिली.
त्यांनी अनेक प्रकारच्या कोरोनाच्या चाचण्याबाबत माहिती देत प्रत्येक चाचण्यांची सखोल माहिती दिली. डॉ. राजपूत यांनी सकारात्मक विचार आणि समर्पित वृत्ति हा उपचाराचा अतिशय महत्वाचा भागअसल्याचे स्पष्ट केले. याशिवाय डॉ राजपूत यांनी आधुनिक उपचार पद्धती, सद्या डॉक्टर काय काय ट्रीटमेंट देत असतात याची सखोल माहिती दिली .त्याच बरोबर झूम वर उपस्थित रोटरी सद्सयांच्या प्रश्नांची सखोल उत्तरे दिलीत. या व्याखानास मोठ्या प्रमाणात रोटरी सदस्य व नागरिकांची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन प्रा, विजय गर्गे यांनी केले.तर आभार प्रवीण बगाड यांनी मानलेत.