धरणगाव (प्रतिनिधी) शहरात मुंबई येथून दाखल झालेल्या तरुणाची कोरोनाचा संशयित म्हणून आज तपासणी करण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयात लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी भेट पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयास १५ गादी आणि बेडशीट भेट देण्याची घोषणा केली. एवढेच नव्हे, तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधत धरणगावच्या रुग्णालयास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष सुविधा देण्याची विनंती केली.
धरणगावात आज मुंबई येथून दाखल झालेल्या तरुणाची शासनाच्या निर्देशाप्रमाणे तपासणी करण्यात आली होती. याची माहिती मिळताच लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. यावेळी श्री. चौधरी यांनी १५ गादी आणि बेडशीट भेट देण्याची घोषणा केली. तसेच डॉक्टरांना सूचना केल्या की, धरणगावातील कोणत्याही रुग्णास कुठलीही मदत लागल्यास तात्काळ उपलब्ध करावी. कुणी गरीब असेल किंवा रुग्णालयात कुठली औषधी नसेल, तर तात्काळ माझ्याशी संपर्क करावा मी स्वखर्चाने मदत उपलब्ध करून देईल. दरम्यान, श्री.चौधरी यांनी याचसंदर्भात तात्काळ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधत धरणगावात कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक असलेली मदत देण्याची विनंती केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मागणीनुसार लागणाऱ्या अजून काही वस्तू देण्याचा श्री.चौधरी यांचा मानस आहे.