जळगाव प्रतिनिधी । दिल्ली येथील निजामुद्दीन येथे कार्यक्रमासाठी गेलेल्या दोघांना शहरातील पिंप्राळा परिसरातील मशिदीजवळून रामानंदनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. दोघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, दिल्ली येथील निजामुद्दीन येथे कार्यक्रमाला गेलेले रत्नागिरी येथील रहिवाशी काही दिवसांपुर्वी जळगावात परतले. दोघेही जळगाव शहरातील प्रिंपाळा परिसरातील मशीदिजवळ एका खोलीत राहत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांनी पोलीस कर्मचारी सतीश डोलारे, अनिल फेगडे, राकेश दुसाने या कर्मचार्यांसह पिंप्राळा परिसरात संबंधित दोघांचा शोध घेतला. दोघांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००