जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ९ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ११ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
कोरोना रिपोर्टनुसार भुसावळ तालुक्यात १ , चोपडा २, पाचोरा २ आणि चाळीसगाव ४ असे एकुण ९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर उर्वरित १२ तालुके निरंक आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ५८८ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले त्यापैकी १ लाख ३९ हजार ९३० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ८३ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.