जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयात पाठविलेल्या कोरोना अहवालात आज ६६ बाधित रूग्ण आढळले आहे. तर ५५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पाच तालुके निरंक आढळून आले आहेत.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-२२, जळगाव ग्रामीण-२, भुसावळ-१३, अमळनेर-२, चोपडा-८, पाचोरा-१, भडगाव-२, धरणगाव-०, यावल-७, एरंडोल-०, जामनेर-१, रावेर-२, पारोळा-२, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-६, बोदवड-० असे एकुण ६६ बाधित रूग्ण आढळले आहे.
आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ५५ हजार ९२१ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैळी ५४ हजार १३३ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहेत. तर ४५९ बाधित रूग्ण विविध कोरोना रूग्णालयात उपचार घेत आहे. आज सुदैवाने एकाची रूग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात एकुण १ हजार ३२९ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.