जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ११ बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-१, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-०, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-३, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-१, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-१, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ५४६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ लाख ३९ हजार ८६७ रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. तर १०४ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.