जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात १ कोरोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात आज भुसावळ तालुक्यातून एक बाधित रूग्ण आढळून आला आहे. आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७५८ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जिल्ह्यात ११ बाधित रूग्ण असून विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.