जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी आलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून १८ रूग्ण आढळून आले आहे. तर ६८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आठ तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे.
आजची आकडेवारी
जळगाव ग्रामीण, चोपडा, भडगाव, एरंडोल, जामनेर, पारोळा, चाळीसगाव आणि बोदवड या तालुक्यात आजही एक रूग्ण आढळले नाहीत. तर जळगाव शहर-११, भुसावळ, अमळनेर, पाचोरा, धरणगाव, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येकी एक रूग्ण असे एकुण जिल्ह्यात आज १८ रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ५३ हजार ५५० रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५१ हजार ७०७ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर ५७१ रूग्ण उपचार घेत आहे. विशेष म्हणजे आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने आज दिली आहे.