कोरोना : जिल्हात आज ३४ रूग्ण बाधित आढळले; ५७ रूग्णांची कोरोनावर मात

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या आजच्या अहवालातून जिल्ह्यातून ३४ रूग्ण आढळून आले आहे. तर ५७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच्या अहवालात सात तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-३, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-४, अमळनेर-१२, चोपडा-०, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-१, रावेर-५, पारोळा-०, चाळीसगाव-५, मुक्ताईनगर-०, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातले १ असे एकुण ३४ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

आजच्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण ५४ हजार ८७२ कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यापैकी ४२७ रूग्ण विविध कोवीड सेंटरला उपचार घेत आहे तर ५३ हजार १३९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज जळगाव शहरातील एका बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकुण मृत्यू १ हजार ३०६ वर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

Protected Content