कोरोना : जामनेरात ७५ पीपीई किट व फेस शिल्डचे वाटप

जामनेर,प्रतिनिधी । कोरोना संकटाचा सामना करताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई सुरक्षा किट हे अत्यावश्यक ठरते. सुदैवाने जळगाव जिल्ह्यात गंभीर परिस्थिती नसली तर भविष्य कालीन उपाय योजना म्हणून आरोग्य यंत्रणा सज्ज असावी या हेतूने सुरेशदादा जैन पतसंस्था व आनंदयात्री संस्था यांच्यातर्फे पीपीई सुरक्षा किट व फेस शिल्डचे आज वाटप करण्यात आले.

सुरेशदादा जैन पतसंस्थेतर्फे जामनेरातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्रांना अत्याधुनिक अश्या ७५ पीपीई किटचे तर सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना फेस शिल्डचे वाटप आनंदयात्री संस्थेच्या वतीने करण्यात आले. यापुर्वी वैद्यकीय अधिकारी यांना पी.पी.ई. किट व आशा स्वयंसेविका यांना मास्क आणि सॅनिटाईझरचे वाटप संस्थेकडून करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांच्या हस्ते सर्व वैद्यकीय अधिकारी यांना किट वाटप करण्यात आले. सुरेशदादा जैन पतसंस्थेचे चेअरमन सुरेश धारिवाल, अमित धारिवाल, पिट्टू चिप्पड, माधव चव्हाण, अबूलाल शेख यांसह आनंदयात्री परिवाराचे अध्यक्ष डॉ. अमोल सेठ, डॉ. आशिष महाजन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, गणेश राऊत यांची उपस्थित होती. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांनी या उपक्रमांबद्दल पतसंस्थेचे आभार व्यक्त केले. डॉ. हर्षल चांदा,डॉ.नरेश पाटील, डॉ.पल्लवी सोनवणे, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.मनोज तेली,डॉ. पी. एस.अल्हाट, डॉ.विनोद भोई, डॉ.विवेक जाधव,डॉ.विजय पाटील, डॉ.वैभव पाटील, डॉ.कुणाल बावसकर, डॉ.सागर सोनालकर, डॉ. पूनम ढेकळे, डॉ.अश्विनी वाघ,आशा कुयटे, गोपाळ पाटील, पी. आर. पवार व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content