कोरोना : जगभरात १५० हून अधिक लशींवर संशोधन

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था / कोरोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात सध्या १५० हून अधिक लशींवर संशोधन सुरू आहे. मानवी शरीरातील SARS-CoV-2 ओळखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शरीरातील पेशींवर ACE-2 रिसेप्टर असतात.ते विषाणूवर असलेल्या स्पाइक प्रोटीनचे लक्ष्य असतात. यांचा प्रतिकार करून विषाणू शरीरात प्रवेश करतात. शरीरात दाखल झाल्यानंतर विषाणू संख्या वाढवतो आणि संसर्ग शरीराच्या इतर भागात पोहचतो. विषाणूंशी लढण्यासाठी शरीरात अॅण्टीबॉडी आणि टी-सेल असतात. लशीद्वारे कोणत्याही संसर्गाशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आव्हान आहे. आठ ते दहा लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. रशियाने सामान्यांसाठी लस उपलब्ध केली आहे. चीनने लष्करातील जवानांना लस देण्यास सुरुवात केली आहे.

लस विकसित करणारे शास्त्रज्ञ सध्या विषाणूचा वापर करून लस विकसित करत आहेत. त्यासाठी विषाणूच्या शक्तीहीन घटकाचा वापर करतात. विषाणूला कमकुवत करण्यासाठी प्राण्यांच्या पेशींद्वारे दिले जाते. म्युटेशन होईपर्यंत ही क्रिया सुरू असते. म्युटेशमुळे आजार फैलावत नाही. विषाणूला निष्क्रिय करण्यासाठी फॉर्मलडिहाइड अथवा उच्च तापमानावर ठेवले जाते. विषाणू मानवाच्या शरीरात सोडला जातो. त्यानंतर मानवी शरीरात अॅण्टीबॉडी आणि टी-सेल निर्माण होतात. शरीरात घातक विषाणूचा शिरकाव झाल्यास त्यांचा मुकाबला करण्यास शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आधीच सज्ज असते.

व्हायरल वेक्टर लशीसाठी गोवर अथवा सामान्य सर्दी निर्माण करणाऱ्या विषाणूत जेनेटिकली बदल केले जातात. त्यामुळे शरीरात विषाणू स्पाइक प्रोटीनची निर्मिती करतात. हे अतिशय कमकुवत असतात. त्यामुळे शरीरात आजार फैलावत नाही. अशा प्रकारची लस अतिशय सुरक्षित समजली जाते आणि प्रभावीपणे रोगप्रतिकार शक्ती निर्माण करते .

न्युक्लिक अॅसिड लशीत कोरोना विषाणूच्या प्रोटीन, विशेषत: स्पाइक प्रोटीन बनवणाऱ्या डीएनए अथवा आरएनए मानवी शरीरांच्या पेशीत दिले जातात. शरीरात व्हायरल प्रोटीन झाल्यामुळे त्यांना व्हायरस समजून अॅण्टी बॉडी आणि सेल्यूर इम्यून निर्माण होतात ही पद्धत सुरक्षित असली तर आतापर्यंत प्रभावी असल्याचे समोर आले नाही.

अनेक संशोधक कोरोना विषाणूच्या प्रोटीनला थेट शरीरात इंजेक्ट करण्याचा मार्ग सुचवतात. अशावेळी प्रोटीन अथवा प्रोटीन शेलच्या तुकड्यांना जे कोरोना व्हायरसच्या बाहेरील भागांसारखे असतात त्यांना इंजेक्ट केले जाते. शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याचे काम करतात.

Protected Content