नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान काही गोष्टींवर सूटही देण्यात आली आहे. ४ मेपासून सुरु होणाऱ्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या भागात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून उघडण्यास सशर्त परवानगी असेल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले. त्याशिवाय, ई-कॉमर्स कंपन्या या क्षेत्रात अत्यावश्यक सामांनांव्यतिरिक्त इतर सर्व वस्तूंची विक्री करु शकतील.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून उघडण्याची परवानगू असेल. येत्या 4 मेपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून चालक त्यांची दुकानं उघडू शकतील, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिली. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य आहे.
रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. ही नियमवामली फक्त काही मर्यादित क्षेत्रात लागू असेल. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली मात्र त्याचेही काही नियम पाळण्यात आले आहे.