कोरोना गेल्या १०० वर्षांतील सर्वात वाईट आरोग्य आणि आर्थिक संकट : शक्तिकांता दास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आपली अर्थव्यवस्था आणि आर्थिक प्रणाली किती मजबूत आहे या कोरोनाच्या काळात आपण दाखवून दिले आहे. गेल्या १०० वर्षांतील आपल्या आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील शतकातील हे सर्वात वाईट संकट आहे, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे. ते ‘एसीबीय बँकिंग अँड इकॉनॉमिक्स कॉनक्लेव्ह’ या आयोजित व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.

 

 

फेब्रुवारी २०१९ पासून आतापर्यंत आम्ही १३५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. वृद्धी दरात झालेल्या घरणीतून सावरण्यासाठी तशा प्रकारची पावले उचलण्यात आली आहेत. याबाबत मॉनिटरी पॉलिसी कमिटी रिझॉल्युशनमध्येही सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटाने अनेकांचे प्राणही गेले आणि अनेकांच्या जीवनशैलीवर त्याचा परिणामही झाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच गेल्या १०० वर्षांतील आपल्या आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवरील शतकातील हे सर्वात वाईट संकट आहे. परंतू अर्थव्यवस्थेच्या वृद्धीलाच रिझर्व्ह बँकेचे प्राधान्य आहे. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहे, अशी माहिती देखील शक्तिकांता दास यांनी दिली.

 

Protected Content