जळगाव, प्रतिनिधी । कोविड रुग्णाच्या खाजगी रुग्णालयाच्या बिलांचे शासकीय लेखा परिक्षण सुरु ठेवण्यात यावे अशी मागणी शिवसेना माजी महानगरप्रमुख गजानन मालपूरे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा फार मोठी संख्या होती व त्यात अनेक रुग्णांनी खाजगी रुग्णालयमध्ये उपचार धेतलेले आहेत. त्यावेळी त्यांच्याकडून काही खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अवाच्यासव्वा रक्कमा रुग्णालयाकडून वसुल केलेल्या आहेत. त्यासोबत हे ही तितकेच खरे आहे की, काही खाजगी रुग्णालयांनी मोलाच सहकार्य केलेले आहे व परिस्थितीचे भान ठेवून कोरोना योद्धा म्हणून कार्य केले त्याचा गौरव होतच आहे. त्याच बरोबर ज्या डॉक्टरांनी परिस्थितीचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने अवास्तव व अवाजवी बिले आकारलेली आहेत. त्यावेळी शासनाचे लेखा परिक्षणामुळ अनेक रुग्णांना फायदा होवून काही रुग्णालयाकडून अवास्तव आकारलेली रक्कम देखील परत करण्यात आलेली आहे. त्यामुळे सद्य परिस्थितीचे भान ठेवून, शासकीय लेखा परिक्षण सुरु राहणे गरजेचे व रुग्ण हिताचे आहे. कारण कोरोना काळात अनेकाचे व्यापार, व्यवसाय, खाजगी नोकऱ्या तसेच शारीरिक व मानसिक ताणावर जास्तीचा आर्थिक ताण सर्वसामान्य माणसावर पडलेला आहे, अश्या परिस्थिती सर्व सामान्य माणसांना नित्यनियमित गरजा भागविणे देखील कठीण झालेले असतांना कोविड महामारीशी सामना करावा लागत आहेत. यात शासकीय नियमानुसार अनेक डॉक्टर बिले आकारीत नाहीत त्यात शासकीय लेखा परिक्षण बंद झाले तर सर्व सामान्यांनी न्याय कोठे मागावा याबाबत संध्रम निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी शासकीय लेखा परिक्षण समिती कायम स्वरुपाची ठेवावी जेणेकरुन रुग्णांना या हलाखीच्या परिस्थितीत मदत होईल व काही डॉक्टरांकडून बिलात व औषधींच्या रुपाने होणारी लुट थांबण्यास मदत होणार आहे. जोपर्यंत कोविड आजारावर पुर्णपणे नियंत्रण होत नाही तो पर्यंत ही लेखा परिक्षण समिती ठेवण्यात यावी अशी मागणी गजानन मालपुरे, राहुल नेटलेकर आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3508864625859987/