जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात दिवसभरात कोरोना संक्रमित ३ रुग्ण आढळून आले असून ८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात जळगाव शहरात तीन संक्रमित रूग्ण आढळून आले आहे तर ८ बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहर वगळता सर्व तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ६०९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ९७० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ६४ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.