कोरोना काळात सेवा दिलेल्या सेवानिवृत्त सैनिकांसह पत्रकारांचा गौरव (व्हिडीओ)

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा शहर व तालुक्यातील ५० सेवानिवृत्त सैनिकांनी कोरोना काळात मोफत सेवा दिली होती. या सैनिकांचे ऋण फेडण्यासाठी १३ रोजी बुधवारी येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयातर्फे कोरोना योद्धा व पत्रकार बांधवांचा प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात करण्यात आला.

पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांचे कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन विलास जोशी, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र मोरे, गणेश चौबे, दत्तात्रय नलावडे, विकास पाटील, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळु पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

पाचोरा येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयातर्फे कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता मोफत सेवा देणाऱ्या माजी सेनिकांमधे बाळू पाटील, गणेश सोळुंखे, दिपक सांगळे, गजानन तेली, ज्ञानेश्वर सोनवणे, विनोद पाटील, दिपक फुलचंद पाटील, दत्तु खरे, युवराज पाटील, रतिलाल पाटील, किशोर पाटील, सुनिल खवले, दिपक तुळशीराम पाटील, अनिल सावळे, दिपक मधुकर पाटील, संतोष भिल, साहेबराव चित्ते, सुरेश सोनवणे, गिरीष पाटील, राजेश पाटील, शामसिंग परिहार, प्रमोद पाटील, रविंद्र पाटील, रविंद्र पवार, बापु बडगुजर, विजय पाटील, विजय बोरसे, शांताराम शिंदे, भगवान पाटील, रविंद्र सुर्यवंशी, निवृत्ती पुंड, रविंद्र पाटील, नंदकिशोर पाटील, सौमित्र पाटील, मधुकर पाटील, रविंद्र कोकने, समाधान पाटील, रविंद्र धनराज पाटील, महेंद्र गाढवे, अनिल पाटील, रविंद्र वाघ, शशिकांत सोनवणे, किशोर पाटील, रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या सुवर्णा महाजध, सरोज गोसावी, पत्रकार विनायक दिवटे, प्रा.सी.एन. चौधरी, संदिप महाजन, प्रविण ब्राम्हणे, शामकांत सराफ, नंदु शेलकर, अनिल येवले, शांताराम चौधरी, किशोर रायसाखडा, प्रमोद सोनवणे, प्रमोद पाटील, जावेद शेख, विजय पाटील, अमोल झरेवाल, योगेश पाटील, संजय पाटील, कुंदन बेलदार, गणेश शिंदे, निलेश पाटील, केदार पाटील सह विविध वृत्तपत्रांचे तथा इलेक्ट्रानिक्स मेडिया प्रतिनिधींचा “कोरोना योध्दाम्हणुन गौरव करण्यात आला.

याकामी शकील शेख, रविंद्र दातीर, मुकुंदा पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, व्हाईस चेअरमन विलास जोशी यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन प्रा. सी. एन. चौधरी तर आभारप्रदर्शन पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील पाटील यांनी मानले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/704106350494656

Protected Content