कोरोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल यावलच्या पत्रकारांचा सत्कार

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यात कोरोना काळात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळ्ण्यासाठी सर्वसामान्य नागरीकांनी विविध नियमांचे काटेकोर पालन करावे या दृष्टीकोणातून प्रसारमाध्यमातून आपले जिव धोक्यात घालुन जनजागृतीचे उल्लेखनिय असे कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी दिनाचे औचित्य साधुन पत्रकार अय्युब जी पटेल , पत्रकार सुनिल गावडे, पत्रकार डी.बी.पाटील, पत्रकार राजू कवडीवाले यांचा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात अत्यंत साद्या पद्धतीने मोजक्या मान्यवराच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत सन्मानाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर व आदी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्याहस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आले. 

याप्रसंगी पत्रकार सुनिल गावडे , अय्युब पटेल, डी.बी. पाटील, राजु कवडीवाले, शेखर पटेल, प्रमोद वाणी, तेजस यावलकर यांनाही यावेळी सन्मानीत करण्यात आलेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजय तायडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार चेतन अढळकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर नन्नवरे, विभागीय आबीद कच्छी, पवन पवार यांनी महत्वाचे परिश्रम घेतले. यावेळी पत्रकारांच्या वतीने राजु कवडीवाले यांनी मनसे व्दारे पत्रकारांच्या कार्याची दाखल घेतल्याबद्दल आभार मानले.

Protected Content