कोरोना : आधार नोंदणीकरीता ऑनालाईन अपाँईटमेंट घेण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने सर्वांसाठी नियमावली लागू केली आहे. या नियमावलीतंर्गत सामाजिक अंतर ठेवणे अनिवार्य असल्याने आधार केंद्रामध्ये होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता युआयडीएआय प्राधिकरणाने ऑनलाईन अपॉईंटमेंट सिस्टीम चालू केली आहे.

ज्या नागरीकांना आधार नोंदणी करावयाची आहे. त्यांनी http://ask.uidai.gov.in ही लिंक किंवा मोबाईलवर प्ले स्टोअर मधून mAdhar App डाऊनलोड करुन मोबाईलद्वारे ऑनलाईन अपॉईटमेंट घेऊ शकतात. नागरीकांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेता सामाजिक अंतर ठेवण्यासाठी आधार नोंदणी करण्याकरीता व अद्यावत करण्यासाठी ऑनलाईन अपॉईटमेंट घेणे सोईचे होईल. ऑनलाईन अपॉईंटमेंट सेवा ही विनामूल्य असून त्याकरिता नागरीकांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. मात्र UIDAI प्राधिकरणामार्फत आधार अद्ययावत करण्यासाठी जे शुल्क ठरविण्यात आले आहे ते शुल्क मात्र नागरीकांना अदा करावे लागेल.

ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याकरीता आपण कोणत्याही सायबर कॅफेद्वारे आधार नोंदणीकरिता ऑनलाईन अपॉईंटमेंट घेत असताना जर ते आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत असतील तर ही बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे यांनी केले आहे.

Protected Content