जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज नव्याने २० रूग्ण संशयित कोरोना म्हणून दाखल करण्यात आले आहे. दिवसभरात ११० रूग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले त्यातील २० जणांना संशयित म्हणून दाखल केल्याची माहिती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
२० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात कोविड-१९ संबंधित तपासणी करण्यातसाठी ११० जणांची स्क्रिनिंग करण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३ रूग्ण पॉझिटीव्ह आले होते. त्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. एकाची प्रकृती बरी झाली आहे तर शनिवारी ६० वर्षीय महिला कोरोनाबाधित म्हणून निष्पन्न झाले आहे. रविवारी कोरोना संशयित ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलाचा मेडीकल अहवाल अद्याप आलेला नाही. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात आजपर्यंत ३०४ रूग्ण संशयित म्हणून दाखल होते. त्यातील २८१ जणांचे मेडीकल अहवाल निगेटीव्ह, ३ पॉझिटीव्ह, २ रिजेक्टटेड करण्यात आले तर १८ जणांचे मेडीकल अहवाल येण्याचे बाकी आहेत.
धक्कादायक : मुंबईत ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण
कोरोना अहवाला निगेटीव्ह २८१ पैकी २२३ जणांना होम क्वॉरंटाईन म्हणून वैद्यकिय अधिकारी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत ४ हजार ३३९ जणांचे स्क्रिनिंग करण्यात आल्याची माहिती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.