कोरोनाविरोधातील लढाई संपलेली नाही

नवी दिल्ली वृत्तसंस्था । चार महिन्यांचा उपयोग देशातील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा तयार करण्याबरोबर मानवी संसाधन वाढवणं आणि पीपीई किट्स, एन-९५ मास्क व व्हेटिंलेटर्स तयार करण्यासाठी करण्यात आला,” असं सांगत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देशातील कोरोनाविरूद्धची लढाई संपली नसल्याचं प्रतिपादन केलं. संसदेत बोलताना हर्ष वर्धन यांनी देशातील परिस्थितीविषयी माहिती दिली. त्याचबरोबर “कोरोनाविरूद्धची लढाई अजून फार दूर आहे,” अशी माहिती संसदेत दिली.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले,”लॉकडाउनमुळे १४ लाख ते २९ लाख नागरिकांना संसर्ग होण्यापासून सुरक्षित ठेवता आले. देशात कडक लॉकडाउन केल्यामुळे जवळपास ३७ ते ७८ हजारांच्या दरम्यान मृत्यू रोखण्यात यश आलं.

“मी सदस्यांना आठवण करून देऊ इच्छितो की, कोरोनाविरुद्धची लढाई अजून फार दूर आहे. मी सभागृहाला सांगतो की, देशातील प्रसार रोखण्यासाठी सरकारनं सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. देशातील मृत्यूदर आणि रिकव्हरी दर सध्या अनुक्रमे १.६७ टक्के आणि ७७.६५ टक्के इतका आहे. भारत करोना मृत्यूची संख्या प्रति मिलियन ३,३२० इतकी रोखण्यास यशस्वी ठरला आहे. जो की जगात सर्वात कमी आहे,” असं हर्ष वर्धन यांनी संसदेत सांगितलं.

Protected Content