नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरणारे ‘रेमडेसिवीर’ या औषधाचे आता भारतातही होणार उत्पादन होणार आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत, केवळ त्यांच्यासाठी’ हे रेमडेसिवीर औषध वापरण्यात येणार आहे. यासाठी रेमडेसिवीरचे उत्पादन आणि विक्री हेटेरो आणि सिप्ला या कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी औषधी महानियंत्रक विभागाने हा निर्णय घेतला. रेमडेसिवीर हे औषध महाराष्ट्र सरकारलाही हवे होते. त्यासाठी बांगलादेशातून त्याची आयात करण्यात येणार होती. मात्र, काही कारणास्तव ही आयात थांबवण्यात आली आहे. आता भारतातच त्याचे उत्पादन होणार असल्याने कोरोना रुग्णांसाठी ही बाब दिलासा देणारी आहे.