कृत्रिम व्हेंटिलेटरवर गेलेल्या जळगाव जिल्ह्याला कोरोना मुक्त करा ; मराठे यांची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । कृत्रिम व्हेंटिलेटरवर गेलेल्या जळगाव जिल्ह्याला कोरोना मुक्त करून,नागरिकांना वटवृक्षाचा नैसर्गिक प्राणवायू घेण्यासाठी सज्ज करा एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांची नवनियुक्त जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे मागणी केली आहे.

आज जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जळगाव जिल्ह्याला मिळालेले तरुण तडफदार नवनियुक्त जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन त्यांना वटवृक्षाचे रोपटे भेट देऊन स्वागत केले व त्याप्रसंगी कृत्रिम व्हेंटिलेटरवर गेलेल्या जळगाव जिल्ह्याला लवकरात लवकर कोरोनामुक्त करून वटवृक्षाप्रमाणे नैसर्गिक व्हेंटिलेटर वरती आणा,जेणेकरून नागरिकांना नैसर्गिक प्राणवायू घेता येईल व संपूर्ण जिल्हा हा कोरोना मुक्त होईल अशा प्रकारची स्वागतार्थ मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

वटवृक्ष म्हणजेच नैसर्गिक व्हेंटिलेटर
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता व मागील काळातील बेजबाबदार जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे जळगाव जिल्हा कृत्रिम व्हेंटिलेटरवरती गेला व जिल्ह्यातील परिस्थिती अति गंभीर झालेली असताना अशा परिस्थितीमध्ये एनएसयूआयच्या मागणीला महाराष्ट्र सरकारने मान्य करत नवीन तरुण तडफदार जिल्हाधिकारी अभिजीत जी राऊत यांची नियुक्ती करण्यात आली.

स्वागत व अपेक्षा ही
नवनियुक्त जिल्हाधिकारी यांचे जिल्हाभरातून जरी स्वागत होत असले तरीही जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांना नवीन जिल्हा अधिकाऱ्यांकडून अपेक्षा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. सांगली मधील काम बघता अभिजीत राऊत यांच्याकडून जळगाव जिल्ह्याला देखील नक्कीच अपेक्षा आहे की, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती देखील लवकरात लवकर नियंत्रणात येईल.

संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थितीचा दिला आढावा
जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत जी राऊत यांची सदिच्छा भेट घेऊन जिल्ह्यात निर्माण झालेल्या अतिगंभीर परिस्थितीबद्दल सखोल आढावा जिल्हाधिकारी यांना दिला. तसेच जिल्हा प्रशासनाबरोबर जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी सदैव आपल्याला सहकार्य करण्यासाठी तत्पर राहील याची ग्वाही सुद्धा दिली.

Protected Content