वाशिंग्टन : वृत्तसंस्था । कोरोनाने भारत उद्ध्वस्त झाला जगभरात प्रसारास कारणीभूत असलेल्या चीनने अमेरिकेला १० ट्रिलियन अमेरिकी डॉलर द्यावे असा दावा अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी ही मागणी केली आहे. जगभरात कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात जिवित आणि वित्त हानी झाली आहे. याआधी ट्रम्प यांनी कोरोनाला चिनी आणि वुहान येथील व्हायरस असल्याचे म्हटले होते.
व्हायरस जगभर पसरण्यावर ही एक दुर्घटना असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी भारतील परिस्थितीची माहिती देत याआधी कधी कोणत्याही आजारामुळे इतके मृत्यू झाले नसल्याचे म्हटले. “भारतात सध्याची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. भारतातल्या लोकांना खूप चांगले काम करत आहोत असे म्हणायची सवय आहे. पण सत्य परिस्थिती ही आहे की, देश उद्ध्वस्त झाला आहे. खरं तर, प्राणघातक संसर्गामुळे प्रत्येक देश उद्ध्वस्त झाला आहे. आता चीनने या सर्व देशांना मदत केली पाहिजे,” असे ट्रम्प यांनी म्हटले.
ही घटना दुर्घटनेमुळे झाली असली तरी तुम्ही त्या देशांकडे पाहा ते आता पुन्हा आधीसारखे होणार नाहीत. आपल्या देशावरही याचा वाईट परिणाम झाला आहे. पण बाकीच्या देशांना आपल्यापेक्षा जास्त हानी पोहोचली आहे. त्यामुळे हा व्हायरस कुठून आणि कसा आला याचा शोध घ्यायला हवा” असे ट्रम्प म्हणाले.
२०१९ मध्ये चीनमधील वुहानमध्ये लागण झाल्याची पहिली घटना समोर आली होती. विषाणू चीनच्या वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधून बाहेर पडला असावा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. चीनने मात्र वेळोवेळी अमेरिकेचा हा आरोप नाकारला आहे.