कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांचा निर्णय

 

बुलढाणा , प्रतिनिधी ।  राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा 30 मार्च रोजी वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस  कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात साजरा करत असतो. परंतु गेल्या वर्षाभरापासून संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडणाऱ्या कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर ह्या वर्षी माझा वाढदिवस कोणीही साजरा करू नये असे आवाहन ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. 

ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर  प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात येते की कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर 30 मार्च रोजी डॉ. शिंगणे यांना   कोणालाही भेटणार नाहीत. कोणीही पुष्पगुच्छ, हारतुरे, शुभेच्छा बॅनर यावर व्यर्थ पैसा खर्च करू नये. तो पैसा गरजू कोरोना रुग्णांना द्यावा. काही कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तरी कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबीर व कोरोनाशी संबंधित कार्यक्रम वगळता इतर कोणतेही कार्यक्रम घेऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.

ना डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केलेले आवाहन असे की,  30 मार्च रोजी माझा वाढदिवस, वाढदिवसानिमित्त माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण हारतुरे, पुष्पगुच्छ, बॅनर यामध्यमातून मला शुभेच्छा देत असता. परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा मी निर्णय घेतला असून कोणीही हारतुरे, पुष्पगुच्छ, बॅनर यावर व्यर्थ खर्च करू नये. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास ह्याच माझ्यासाठी आपणाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा राहतील.

 

Protected Content